घोटण | १६ जानेवारी | शिवाजी घुगे
(education) शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथील समता जोगेश्वरी मंडळाच्या एकनाथ माध्यमिक विद्यालय विद्यालयाने चित्रकला इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. गेली सतरा वर्ष चित्रकला इंटरमिजीएट आणि एलिमटरी परीक्षेत विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
(education) इंटरमीजिएट परीक्षेसाठी विद्यालयातून आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अ श्रेणीत पूनम लक्ष्मण चितळे, श्रावणी अंबादास पाडळे, प्रणव हनुमान क्षीरसागर, ब श्रेणीत ऋतुजा रमेश सुपेकर, सायली संदीप काकडे, क श्रेणीत पूजा गणेश भागवत, शुभम गोरख काकडे, वैष्णवी संतराम कुरुंद आदी विद्यार्थांनी उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला.
एलिमेंटरी परीक्षेसाठी विद्यालातून सोळा विद्यार्थी सहभागी झाले होते, पैकी अ श्रेणीत यश प्रकाश पाडळे, ब श्रेणीत श्रुतिका राऊत, अश्विनी काळे, शुभम भागवत, श्रुतिका भागवत, रुपाली कताडे, आदिती भागवत, पार्थ लोखंडे आणि क श्रेणीत अंजली भागवत, शिफा शेख, पूनम कवळे, वैष्णवी कवळे, पूजा निकाळजे, रुपेश क्षीरसागर प्रणव धस, प्रियांशी धस आदींनी उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक किशोर पवार यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मोरे, सचिव पवार, मुख्याध्यापक बाळासाहेब घोरपडे, दिलीप रणसिंग, प्रकाश दहिफळे, कैलास नजन, नवनाथ कदम, देवेंद्र बोडखे, अर्जुन घुगे, विद्या भागवत, आशा फड, किशोर गोर्डे, सुबोध बरकले, काकासाहेब पाटेकर, समद शेख, संजय मगर, धोंडीराम काळे, दत्तात्रय गुजर आदी शालेय कर्मचाऱ्यांनी, सरपंच संतोष धस, गोकुळ भागवत, सुरेश गजभिव व समस्त ग्रामस्त यांनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर