Ahmednagar News: नाभिक महामंडळ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अनिल निकम - Rayat Samachar

ahmednagar news: नाभिक महामंडळ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अनिल निकम

rayatsamachar
2 Min Read

अहमदनगर | २६ सप्टेंबर | विजय मते

ahmednagar news नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी अनिल निकम यांची उत्तर महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, नासिक, जळगांव, धुळे , नंदूरबारसाठी कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी महामंडळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, सरचिटणीस पांडुरंग भंवर, राज्य महिलाध्यक्षा भारती सोनवणे तसेच युवा कार्याध्यक्ष सुरेन्द्र कावरे, नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते. कल्याणराव दळे यांच्या हस्ते अनिल निकम यांना नियुक्तीचे पत्र देवुन सन्मान करण्यात आला.

आज अनेक संस्था आणि संघटना आपल्या राज्यात आहेत. आपल्या आजूबाजूच्या जातीच्या धर्माच्या विविध समाजाच्या संघटना दिसतील. सर्व संघटनांचा हेतू, उद्देश हा व्यापक हित साध्य करणे हा असतो. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ हि संघटना देखील व्यक्ती व्यक्तींमध्ये जिव्हाळा निर्माण करुन सर्वांना संकटात दिलासा देण्याचे काम करते. अहमदनगर जिल्ह्यात नाभिक महामंडळाचे काम लोकहिताचे असल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद असतो. आपुलकी व आपलेपणाची भावना ठेवुन संघटना अजून विकसित करण्याचे काम मी प्रामाणिकपणे करील, असे प्रतिपादन अनिल निकम यांनी केले.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, मी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपद घेतले असले तरी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करीत राहणार. समाजावर होणारा अन्याय, नाभिक महामंडळाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच सर्व नाभिक समाजातील प्रत्येक बांधवांना बरोबर घेवुन सर्व कार्याचा ठसा उमटवणार, असे सांगितले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading