राहुरी | २२ डिसेंबर | नाना जोशी
Ahilyanagar News शहरातील प्रगती विद्यालयासमोर असलेल्या उघड्या डीपीला “संरक्षण-कवच” बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे यांनी उपकार्यकारी अभियंता बार्से यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे भर पेठेत असलेल्या या उघड्या डीपी पासून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांची डीपी समोरील रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात ये-जा चालू असते.विद्यालयासमोरील मैदानात दलित-आदिवासी समाजाच्या लोकांची वस्ती आहे. त्या वस्तीतील लहान-लहान मुले मैदानावर खेळत असतात व त्यांचीही वर्दळ या डीपीच्या आसपास असते. भविष्यात काही हानी झाल्यास त्या होणाऱ्या घटनेला जबाबदार कोण ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तरी एम.एस. ई. बी. ने लवकरात-लवकर या उघड्या डीपीला संरक्षण कवच बसवावे, अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
हे हि वाचा : जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.