Rayat SamacharRayat SamacharRayat Samachar
Reading: Agriculture | स्पर्धा नाही, संधी ! राज्याच्या कृषी विकासासाठी तयार करा नवा ‘लोगो आणि घोषवाक्य’ ; आपल्या प्रतिसादाची अपेक्षा
Share
Rayat SamacharRayat Samachar
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • जिल्हा
  • आर्थिक
  • कृषि
  • राजकारण
  • क्रीडा
  • विशेष
Search
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • जिल्हा
  • आर्थिक
  • कृषि
  • राजकारण
  • क्रीडा
  • विशेष
Follow US
Rayat Samachar > आवाहन > Agriculture | स्पर्धा नाही, संधी ! राज्याच्या कृषी विकासासाठी तयार करा नवा ‘लोगो आणि घोषवाक्य’ ; आपल्या प्रतिसादाची अपेक्षा
आवाहनकृषि

Agriculture | स्पर्धा नाही, संधी ! राज्याच्या कृषी विकासासाठी तयार करा नवा ‘लोगो आणि घोषवाक्य’ ; आपल्या प्रतिसादाची अपेक्षा

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 16.06.2025 2:54 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
1 Min Read

पुणे | १६ जून | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या दृश्य माध्यमांमधील सशक्त ओळख निर्माण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विभागाने नवीन बोधचिन्ह (Logo) व घोषवाक्य (Tagline) तयार करण्यासाठी राज्यभरातील सर्व नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा सर्वसामान्य जनतेसाठी खुली असून, सृजनशील आणि प्रेरणादायी संकल्पना विभागाकडे सादर करून सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे. शेतकरी कल्याण, शाश्वत शेती, कृषी संशोधन यांचा समावेश असलेले बोधचिन्ह आणि विभागाच्या कार्याशी सुसंगत घोषवाक्य अपेक्षित आहे. घोषवाक्य केवळ मराठी भाषेत असावे व त्याबाबत १०० शब्दांतील स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे –

Logo विभाग:
▪ प्रथम पारितोषिक – ₹1,00,000
▪ 2 उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ₹10,000

Tagline विभाग:
▪ प्रथम पारितोषिक – ₹50,000
▪ 2 उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ₹5,000

संपूर्ण कलाकृती JPEG/PNG तसेच AI/SVG/PDF या स्वरूपात [email protected] या ईमेलवर २५ जून २०२५ पर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२५५३७८६५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

“तुमच्या कल्पनाशक्तीला द्या एक नवी दिशा — राज्याच्या कृषी विकासात घ्या सर्जनशील सहभाग!” या घोषणेने कृषी विभागाने सर्जनशील व्यक्तींना एक नवा मंच उपलब्ध करून दिला आहे.

 

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Threads Copy Link
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Also Like

अहमदनगरताज्या बातम्या

Election | सहकारी निवडणुका थेट 31 मेपर्यंत पुढे ढकलल्या; बारामती- राहुरी पोटनिवडणुकीचा परिणाम

30.03.2026
अहमदनगरआर्थिक

Crime | वैभवशाली अर्बन बँक घोटाळा 100 कोटींच्या मालमत्ता जप्त, ‘व्हाईट कॉलर’ आरोपींचा पर्दाफाश; यादी वाचा

30.03.2026
क्रीडाताज्या बातम्या

Sports | मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; 220 धावांचा यशस्वी पाठलाग

30.03.2026
अहमदनगरआवाहन

Social | संवादाची बीजं रुजवुन दुराव्याच्या भिंती कोसळतील, आपुलकीचा पूल उभा राहील- लाटकर; ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन

29.03.2026
Rayat SamacharRayat Samachar
Follow US
Rayat Samachar News Network@2026
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?