मुंबई | १५ जुलै | प्रतिनिधी
(Agriculture) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून गंभीर आरोप केला आहे की, शेतकरी आंदोलक कृष्णा डोंगरे यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या डोंगरे यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
(Agriculture) संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील कृष्णा डोंगरे यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष केला. मात्र त्यांच्यावर खोटा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये भाजपमधील नेते, पोलीस अधिकारी व काही धार्मिक व्यक्ती सामील असल्याचा दावा त्यांनी केला.
(Agriculture) “शेतकऱ्यांना न्याय मिळावा, असे वाटत असेल तर कृष्णा डोंगरे यांची सखोल चौकशी करून त्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
