(Agriculture) देवगडला पिकत नाही त्यापेक्षा जास्त आंबा अहमदनगर, कोथरूड, सिंहगड रोड किंवा पुणे-मुंबईच्या गल्लीबोळात ‘देवगड हापूस‘च्या नावाने विकला जातो. देवगड हापूस आंब्यांवर आता युनिक आयडी (UID) कोड ‘देवगड हापूस’च्या नावाने होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितचे महत्वपूर्ण पाऊल.
(Agriculture) देवगड अल्फोन्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी ‘हापूस (अल्फोन्सो)’च्या भौगोलिक संकेत (GI) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ (TP Seal UID) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास TP Seal UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल. असे युआयडी असलेले आंबेच ‘देवगड हापूस’ किंवा ‘देवगड अल्फोन्सो’ म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार.
(Agriculture) या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होईल. ग्राहकांना केवळ GI प्रमाणित, अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील, असा संस्थेचा विश्वास आहे.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितचे संचालक सदस्य ॲड. ओंकार एम. सप्रे म्हणाले, देवगड तालुक्यातील हापूस आंबा गेल्या शतकाहून अधिककाळ आपल्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे ८०% पेक्षा जास्त आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत. गेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जातात. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत. त्यामुळेच ‘हापूस (अल्फोन्सो)’च्या जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने TP Seal UID सक्तीचे करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
या प्रकल्पाकरिता TP Seal UID चे पेटंट असलेल्या संस्थेने मुंबई स्थित सन सोल्यूशन्स संस्थेबरोबर करार केला आहे, अशी माहिती कांचन गोगटे सप्रे यांनी दिली.
Your Trusted Source for Accurate and Timely Updates!
Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.