Advocate | लांडे पाटील लॉ फर्मचे 2 ऑक्टोबरला उद्घाटन

शेवगाव | ०१.९ | रयत समाचार

(Advocate) न्यायक्षेत्रात महत्त्वाचे योगदान देण्याच्या ध्येयाने सुरू होत असलेल्या लांडे पाटील लॉ फर्मच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवारी ता. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देताना ॲड. सुभाष लांडे यांनी “वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहावे” असे आवाहन केले आहे.

(Advocate) यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत लांडे पाटील लॉ फर्मचे उद्घाटन होणार असून, या उपक्रमातून समाजातील गरजूंसाठी कायदा सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे.

(Advocate) सोहळ्याचे निमंत्रक ॲड. विशाल लांडे पाटील व अजिंक्य लांडे पाटील असून, प्रमुख आयोजक ॲड. रजत व ॲड. साहिल लांडे पाटील आहेत. लांडे पाटील परिवार या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करणार आहे.
हा सोहळा वृंदावन कॉलनी, वात्सल्य बालरुग्णालयाच्या पाठीमागे, शेवगाव कोर्टाजवळ, मिरी रोड, शेवगाव येथे होणार असून, स्थानिक नागरिक, समाजातील मान्यवर व विधिज्ञ क्षेत्रातील व्यक्तींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपली साथ, सदिच्छा आणि आशीर्वाद हाच आमच्या प्रवासाचा खरा बळ आहे, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

 

Share This Article