प्रासंगिक
मुंबई | ९ जून | प्रतिनिधी
(Accident) मुंब्रा येथे झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा होता. मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर नागरिकांचा ताण किती वाढलेला आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आज कोणतीही ट्रेन पहा, ती अक्षरशः फुल्ल आहे – गर्दीला थांबावं असं कोणत्याही गाडीत वाटत नाही.
(Accident) मुंबई ही रोजगाराची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय नागरिकांचे स्थलांतर या शहरात होत आहे. परिणामी, मराठी माणसाच्या जीवनशैलीवर, त्याच्या नोकरी-धंद्यावर आणि दैनंदिन प्रवासावर भीषण परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासनाने कितीही नवीन गाड्या सुरु केल्या, तरीही ही गर्दी आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीत.
(Accident) वसईतील संवेदनशिल लेखिका मेल्सीना तुस्कानो-परेरा यांनी यावर चिंता व्यक्त करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, वर्क फ्रॉम होमची सुविधा शक्य तितक्या कंपन्यांनी देणे आवश्यक आहे. स्थानिकांना प्राधान्य देणं, कंपन्यांनी फ्लेक्सीबल वेळा ठेवणं आणि ग्रामीण व तालुका स्तरावर उद्योग निर्माण करणं हे याचे ठोस उपाय असू शकतात.
त्याचबरोबर, मेल्सीना तुस्कानो- परेरा म्हणतात, “आज मुंबई आपली राहिली नाही. मराठी माणसांसाठी कोणताही वाली उरलेला नाही. पण प्रशासनाच्या धोरणांमध्ये जर बदल झाला, तर थोडाफार फरक नक्कीच पडू शकतो.”
मुंबईतील रेल्वे अपघात ही केवळ एक अपघाती घटना नाही, ती शहराच्या विस्कळीत होत चाललेल्या व्यवस्थेचं प्रतीक आहे. स्थानिक नागरिक, विशेषतः मूळ मुंबईकर, आता या बदलांच्या कडेलोटावर उभे आहेत.

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
