नगर तालुका | २० एप्रिल | प्रतिनिधी
(Accident) आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला ता. १९ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता आग लागली. पद्मश्री पोपट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी तात्काळ हजर झाले. ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग तब्बल ५ तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली.
(Accident) गेल्या महिनाभरात हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा लागण्याची ही तिसरी वेळ असून शेजारील गावातील शेतकऱ्यांनी शेताचा बांध पेटवून दिल्यामुळे डोंगराला आग लागली. सन २०१८ पासून आतापर्यंत जवळपास २३ वेळा हिवरेबाजारचे ग्रामस्थांनी डोंगराची आग विझवली आहे.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
