जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी
अहमदनगर | २६ डिसेंबर | प्रतिनिधी
(Cultural Politics) रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन सालाबादाप्रमाणे यावर्षीही मंगळवारी ता.३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जाणीव फाउंडेशन व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दारूच्या बाटल्या रित्या करण्याऐवजी रक्ताच्या पिशव्या भरुया’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीर शंभूराजे चौक, प्रगती डेअरीसमोर, श्रीराम चौकाजवळ, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे.
(Cultural Politics) २०२४ या सरत्या वर्षात एक अधिकचे पुण्यकर्म आपल्या खात्यात जमा करण्याची सुवर्णसंधी समजून जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी. इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, रक्तदान हे जीवनदान असते, असे आवाहन जाणीव फाउंडेशन यांनी केले.
विशेष म्हणजे सर्व रक्तदात्यांना आकर्षक जीवनोपयोगी भेटवस्तू दिली जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नेहमीप्रमाणे रक्तदान करुन पुण्यकर्मात सहभागी होऊन रुग्णसेवा करण्याच्या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा. फाउंडेशनचे सर्व सदस्य वर्षातून किमान ३ वेळा तरी मोठ्या आनंदाने रक्तदान करतात. पुण्यशील उपक्रमासाठी सर्वांनी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनच्यावतीने संपादक संदिप रोडे, छायाचित्रकार राहुल जोशी, ॲड.विक्रम वाडेकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, इंजि. बाळासाहेब पवार, बांधकाम व्यावसायिक शंतनु पांडव, विमा सल्लागार राहुल काळे, कर सल्लागार विकास जोशी, सुवर्णकार महेंद्र नांदुरकर, प्रगतीशील शेतकरी शिवशर्मा चेमटे, बांधकाम व्यावसायिक सचिन निक्रड, सुभाष बांगर, दीपक भंडारी, सतिश शिंदे, विकास गायकवाड, अतुल इथापे, आशिष वेळापुरे, संजय माने, कैलाश गाडे, गणेश कानवडे, अजय पवार, सतीश इंगळे व इंजिनीअर तथा ॲड. कैलाश दिघे आदींनी केले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा