जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत घेतली ‘माझी वसुंधरा’ शपथ
अहमदनगर | २६ डिसेंबर | प्रतिनिधी
(Education) शहरातील रेल्वेस्टेशन येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या ISO 9001:2015 प्रमाणित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय जुनी मनपा शाळा क्र.४ मध्ये पिंपरी चिंचवड मनपा घनकचरा विभाग अधिकारी राम साठे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अहमदनगर मनपाच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कचऱ्याचे विविध प्रकार व कचरा कशाप्रकारे विलगीकरण केला जातो. त्याचप्रमाणे कचरा वेगवेगळा कसा ठेवायचा. त्याची साठवणूक कशी करायची आणि कचरागाडीपर्यंत कसा पोहोचवायचा याबाबत मार्गदर्शन केले. कचऱ्यापासून काय काय तयार करता येते, याचीही विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांसमवेत ‘माझी वसुंधरा’ शपथ घेण्यात आली.
(Education) यावेळी मनपातील घनकचरा विभागाचे घोरपडे, शुभम पाटील, सुदर्शन अंधारे, ऋषिकेश लांडगे आणि अभिषेक उमाप यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका मनिषा गिरमकर, विठ्ठल आठरे, मेघना गावडे, शबनम खान आदींसह स्थानिक नागरिक, पालक उपस्थित होते.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा