Ahilyanagar News: आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर ह्यांची निवड - Rayat Samachar

Ahilyanagar News: आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर ह्यांची निवड

रयत समाचार वृत्तसेवा
58 / 100

 

समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार

नगर तालुका |२२ डिसेंबर| दिपक शिरसाठ

Ahilyanagar News तालुक्यातील आत्मनिर्धार फाऊंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीची बैठक रविवारी , ता.२२ डिसेंबर रोजी निंबळक येथील आझाद वाचनालय येथे पार पडली. यावेळी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा अध्यक्ष महादेव गवळी यांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आगामी काळात पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा ठराव समितीसमोर मांडला. पर्यावरण संवर्धन समितीच्या कृती कार्यक्रमाची आखणी व धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी उपस्थित सभासदांच्या सर्वानुमते निंबळक माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भानुदास कोतकर यांची समितीच्या अध्यक्षपदी तर संदीप गेरंगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीचे समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात २०० फळ झाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याचा निर्धार सभासदांनी केला.

- येथे आपली जाहीरात प्रसिद्ध करू शकता -
Ad image

बैठकीसाठी ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर, पत्रकार संदीप बांगर , ज्योतिष अभ्यासक संतोष घोलप, कैलास लांडे, आसाराम लोंढे, सुदाम घोडके यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करणे आवश्यक : भानुदास कोतकर

देशभरात प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण झालीय. पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय. त्यामुळे पर्जन्यमानात अनपेक्षित बदल होताना दिसतात. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असून , आरोग्याच्या दृष्टीने नवीन आणि गंभीर समस्यांचे आव्हान यापुढील काळात आपल्यासमोर येईल. त्यावर मात करण्यासाठी आपण सावध भूमिका घेतली पाहिजे. येत्या काळात पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली असल्यानेच , आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत पर्यावरण संवर्धन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी व्यक्त केले.

 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी

Share This Article
Leave a comment