नाल्यांची खोदाई, वृक्षाची नासाडी; वृक्ष कापून दिले थेट व्यापाऱ्यांना ?
राहुरी | १६ डिसेंबर | दत्ता जोगदंड
Forest News तालुक्यातील म्हैसगांव येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष असलेल्या ठिकाणी वन विभागामध्ये पाणी साठवण्यासाठी नाले तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून व्यापाऱ्याला देण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी यांचे दूर्लक्ष होत आहे. येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कुठे घेऊन गेला आहे ? हा प्रश्न निर्माण झाला.
Forest News नाले तयार करण्यासाठी वृक्षतोड केलेल्या ठिकाणी अतिशय मोठमोठी वृक्ष होती. त्यामध्ये निलगिरी, कडूनिंब, आपाटा, करंजी, बांबु, सुबाभूळ, आंबा यासारखी इतर मोठमोठी वृक्ष होती. त्याठिकाणी नाले तयार करण्यासाठी अडचण येते असे म्हणत. वन विभागाचे कर्मचारी यांनी म्हैसगांव, कोळेवाडी, दरडगांव थडी, चिखलठाणमधील झाडे तोडण्यासाठी व्यापारी यास दिले. त्याने सर्व झाडे मशीनच्या साह्याने २५ पेक्षा जास्त झाडे तोडून वाहनामध्ये टाकून घेऊन पसार झाले. या वृक्षतोडीचे पैसे नेमके गेले कुठे? हा एक प्रश्न परिसरातील अनेक लोक विचारत आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. येथे वनरक्षक वनांचे भक्षक बनले की काय ? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
वन विभागात शासनाकडून निधी येऊन नाले तयार करण्यात आले परंतु त्या नाल्यामध्ये पाणी साचत नाही. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया म्हैसगावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगरचे उपाध्यक्ष विलास गागरे यांनी दिली.
म्हैसगांवमध्ये वृक्षतोड झाली नाही. कोणतीही गाडी वृक्षतोड करून घेऊन गेले नाही. याबाबत आम्हाला कोणतेही कल्पना नाही, असे वाय.जे.पाचारणे म्हणाले. तर म्हैसगावचे वनरक्षक गोडेकर यांना वक्षतोडीची व नाले तयार किती केले? शासनाने किती पैसे दिले ? ही महिती विचारण्यासाठी फोन केला असता फोन उचलला नाही व कट केला, असे कमलेश विधाटे यांनी सांगितले.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?