उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये त्रिपक्षीय समितीबाबत सविस्तर चर्चा
सोनई | १५ डिसेंबर | विजय खंडागळे
Politics महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातील व जोडधंद्यातील कामगाराच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी साखर कारखाना मालक प्रतिनिधी व साखर कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस डी.एम.निमसे यांची निवड झाली. याबद्दल मुळा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांच्या हस्ते निमसे सन्मान करण्यात आला.
Politics साखर कामगारांच्या प्रश्नांवर साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार महासंघ या राज्यव्यापी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये त्रिपक्षीय समितीबाबत सविस्तर चर्चा झाली. समितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवाजी औटी, साखर कामगार फेडरेशनचे अविनाश आदिक यांची निवड झाली.