रविवारी पिंपरी चौकात आंदोलन; ‘ईव्हीएम हटाव’साठी जनता रस्त्यावर
पिंपरी | २९ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Pune News राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले बहुमत संशयास्पद आहे. त्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष असताना एवढे यश कसे प्राप्त झाले असा संशय राज्यातील मतदारांमध्ये आहे. यासाठी ईव्हीएमवरील निवडणुक ही प्रक्रियाच चुकीची आहे, असे म्हणत पिंपरी-चिंचवड मधील संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली.
ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी ‘ईव्हीएम हटाओ’ निषेध आंदोलन पिंपरी-चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे. रविवारी ता.१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिली. Pune News
काळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा धडाका नुकताच संपला आहे. यापुर्वी असणारे महायुतीचे सरकार पुन्हा बहुमतात सत्तेत आल्याचा निकाल लागला. मात्र या निकालावर राज्यातील सर्वसामान्य जनता, विद्वान आणि काही उमेदवारही आक्षेप नोंदवत आहेत. निवडणुकीचा हा निकाल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक असल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसेच आहे. शेतकऱ्यांना पुरक असे धोरण न राबविल्यामुळे बळीराजा नाराजीचा सूर आहे. आरक्षणावर ठोस मार्ग न काढल्यामुळे मराठा समाज, ओबीसी समाज प्रचंड नाराज आहे. महिलांवरील, चिमुकल्यांवरील अत्याचार थांबविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच पुण्यासारख्या शहरात कोयता गँगला आळा घालण्यात देखील राज्यसरकार कमी पडत आहे. यासह भ्रष्टाचाराने सरकारला पोखरलेले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यांचे नेते महापुरूषांचे अपमान करून जनभावना दुखावत आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात सर्वच जाती-धर्मातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.
पुढे काळे म्हणाले, असे असतानाही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, ही बाब कोणालाही पटेना झाली आहे. अनेक उमेदवार लाखांच्या मतांनी निवडून येणे शक्य नाही. महायुती सरकार ईव्हीएमचे गौडबंगाल करून निवडणूका स्वतःच्या खिशात घालत आहे. हिंमत असेल तर त्यांनी पुर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणूकांना सामोरे जावे, असे आवाहन सतीश काळे यांनी केले.
बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, या मागणीसाठी तसेच ईव्हीएमच्या गैरकाराभवर आंदोलन करणार असल्याची माहिती सतीश काळे यांनी दिली. आंदोलनात सर्वच लोकशाही मानणाऱ्या संस्था, संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सतीश काळे यांनी केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.