जात वैधता प्रमाणपत्रांच्या त्रुटी पुर्ततेसाठी विशेष मोहीम

oplus_2
10 / 100 SEO Score

अहमदनगर | १४ नोव्हेंबर | प्रतिनिधी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने मागासवर्गीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी १४ ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी विशेष त्रुटी पुर्तता मोहीम राबविण्यात येणार असून या मोहीमेला विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षामधील एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छुक आणि जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अहिल्यानगर येथील कार्यालयात प्रस्ताव दाखल करुन पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित केल्यांनतर अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या सर्व उमेदवारांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर कार्यालयातील चौकशी कक्षाचे जवळ विशेष त्रुटी पूर्तता मोहिम कक्ष तयार करण्यात आलेला आहे. अर्जदार विद्यार्थ्यांनी ई-मेल वर समितीकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती तसेच जाती दावा सिद्ध करणाऱ्या महसुली तसेच शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित रहावे आणि आपल्या प्रकरणांतील त्रुटींची पुर्तता करावी. त्रुटी पूर्तता केलेल्या प्रकरणांवर समितीकडून तात्काळ कार्यवाही करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्रुटी पूर्ततेअभावी प्रकरणे अर्जदार स्तरावर प्रलंबित राहिल्यास त्यास अर्जदार स्वतः जबाबदार असेल.

या विशेष मोहिमेमध्ये अर्जदार यांनी आपआपले जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांची त्रुटी पुर्तता करुन करावी, जेणेकरुन संबंधित अर्जदार यांना वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समितीस सुलभ होईल,असेही समितीकडून कळविण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *