श्रीरामपूर |३० ऑक्टोबर | सलीमखान पठाण
Election आगामी विधानसभा निवडणूक श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून आपले नेते जयंतराव ससाणे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शहर व तालुक्यातील सर्व काँग्रेसजणांनी मागील सर्व मतभेद विसरून एकत्र यावे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत ओगले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. वातावरण आपल्याला अनुकूल आहे. त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे, असे नजीरभाई शेख यांनी आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, मागील वेळी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून लहुजी कानडे यांना तालुक्याने निवडून दिले होते. त्यांनी संघटनेकडे थोडेसे दुर्लक्ष केल्याने ससाणे गट त्यांच्यापासून दुरावला तसेच त्यांनी शहराकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची कामगिरीसुद्धा फारशी समाधानकारक नव्हती याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने यावेळी तरुण तडफदार उमेदवार म्हणून हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली. जयंतराव ससाणे यांनी ज्या पद्धतीने श्रीरामपूर तालुक्याची बांधणी केली होती त्याची आज पुन्हा गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व काँग्रेसजणांनी आपसातील सर्व मतभेद विसरून नवीन पर्वाची सुरुवात करावी. शहरात काँग्रेसमधील दोन्ही गट प्रबळ आहेत. दोन्ही गटांकडे जनमत आहे. त्यामुळे त्याची विभागणी न होता विधानसभा असेल किंवा आगामी काळातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल याकाळात सर्वांनी एक होऊन काँग्रेस पक्षासाठी काम करावे.
जयंतराव ससाणे यांची कारकीर्द यशस्वी होण्यामध्ये शहरातील सर्व जनतेचा मोठा वाटा आहे. मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये जे काही मतभेद झाले त्यातून संघटनेवर देखील परिणाम झाला. त्यामुळे मागील सर्व गोष्टी विसरून पुन्हा एकदा एकदिलाने काँग्रेस पक्ष मजबूत करून ससाणे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व काँग्रेस जणांनी एकत्र यावे, असे आवाहनही नजीरभाई शेख यांनी केले.