Election: कर्जत-जामखेड आमदारकीसाठी सतीश कोकरे यांचा पहिला अर्ज दाखल - Rayat Samachar

Election: कर्जत-जामखेड आमदारकीसाठी सतीश कोकरे यांचा पहिला अर्ज दाखल

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
64 / 100

कर्जत | प्रतिनिधी

Election विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ता. २२ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी ९ जणांनी एकूण १८ उमेदवारी अर्ज नेले. यापैकी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. सतीश शिवाजी कोकरे (खातगाव टाकळी ता.करमाळा) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला.

महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणुकीचा Election  कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी कर्जत तहसील कार्यालय निवडणुकीचे मुख्यालय असून याच ठिकाणाहून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी ता. २२ पासून सुरू झाली. कर्जत तहसील कार्यालयाचा परिसर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उमेदवार आणि त्यांचे मोजके प्रतिनिधी नियम आणि अटी शर्तीनुसार वगळता सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे.

मंगळवारपासून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची Election  प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ९ जणांसाठी तब्बल १८ उमेदवारी अर्ज नेण्यात आले असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. यापैकी सतीश शिवाजी कोकरे (खातगाव टाकळी ता.करमाळा) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज पाहिल्याच दिवशी दाखल झाला.
Share This Article
Leave a comment