Women: भाजप घराणेशाहीला मानणारा पक्ष नाही, त्यामुळे भाजपची उमेदवारी मलाच - सुवर्णाताई पाचपुते, भाजप नेत्या - Rayat Samachar

Women: भाजप घराणेशाहीला मानणारा पक्ष नाही, त्यामुळे भाजपची उमेदवारी मलाच – सुवर्णाताई पाचपुते, भाजप नेत्या

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
64 / 100

श्रीगोंदा | १५ ऑक्टोबर | माधव बनसुडे

Women एक वेळ सूर्य पूर्व दिशेऐवजी पश्चिमेकडून उगवेल पण आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे भाजप नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

भाजपमधून २० वर्षापूर्वी राजकीय कारकीर्द सुरू करून गेली २० वर्षे भाजपला प्रतिकूल, अनुकूल परिस्थितीतही साथ देणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांनी अडीच महिन्यापूर्वी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात फिक्स उमेदवार म्हणून फ्लेक्स लाऊन मतदार संघात दौरा केल्याने त्या प्रकाश झोतात आल्या. गेल्या अडीच महिन्यात मतदारसंघात फिरताना मिळालेला प्रतिसाद, मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यांवरील रोष यातून आपण विजयी होऊ, अशी आशा असल्याचे पाचपुते यांनीसांगितले. गेल्या १० वर्षात आपणावर पक्षाने जबाबदारी दिली, ती पार पाडली पण पक्षाने २०१४, २०१९ मध्ये उमेदवारी दिली नाही. बदल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला तोही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही. असा आरोप करून २०१४ मध्ये भाजपने कामाला लागा असा आदेश दिला पण पक्षात नव्या नेतृत्वाच्या प्रवेशाने उमेदवारी रद्द झाली पण आपण पक्ष वाढीसाठी काम केले. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी प्रचार केला. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रताप पाचपुते यांचा प्रचार केला, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते प्रचार केला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा प्रचार केला, त्यामूळे पक्ष नक्की दखल घेईल. लोकांची मागणी काय आहे याचा आदर पक्ष करेल. पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी कारण भाजप घराणेशाहीचा पुरस्कार करणारा पक्ष नाहीअये त्यांनी ठामपणे सांगितले.

मतदार संघातील फ्लेक्स, दौरा, सुख दुःख, लग्न सोहळे, सामाजिक कार्यक्रमात सहभाग यासाठी रसद पुरवली जाते का? अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारता पाचपुते म्हणाल्या माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही, संस्था नाही, माझा सर्व खर्च वडील शिवाजीराव नांद्रे हे आपल्या शेतातील उत्पादन विकून करत आहेत, असे स्पष्ट करून आम्ही कोणाच्या प्रलोभनाला बळी पडणारे नसून आम्हाला पैशाने कोणी खरेदी करू शकत नाही. आम्ही कोणाच्या आदेशाने उमेदवारी करत नसून कोणाच्या आदेशाने माघार देखील घेणार नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दररोज लोकांच्या प्रश्नात असून मतदारसंघात कुकडी, घोड आवर्तन, डिंभे – माणिकडोह बोगदा, साकळाई उपसा जलसिंचन प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालय, कृषि महाविद्यालय हे पारंपरिक प्रश्न राजकीय अनास्थेमुळे सुटू शकले नाहीत, ही या मतदारसंघाची शोकांतिका असून हे चित्र बदलण्यासाठी माझी उमेदवारी आहे. मतदारांनी आजपर्यंत अनेकांना संधी दिली, पण प्रश्न जैसे थे राहिल्याने मतदारांनीच मला दौऱ्यादरम्यान या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. उमेदवारी करणारच याचा पुनरुच्चार करून मतदारसंघात कोणत्याही आघाडीचे वातावरण नसून लोकच आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सर्वात कमी खर्चात आपण विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

भाजप उमेदवारी देईल का असे विचारता सुवर्णाताई पाचपुते म्हणाल्या मी पक्ष बदलला नाही आणि २० वर्षात पक्षाचे ध्येय धोरणे राबवले. पक्ष वाढवला स्वर्गीय दिलीप गांधी, अभय आगरकर, मा.खा.सुजय विखे, आ.बबनराव पाचपुते, माजी मंत्री आ.राम शिंदे, स्व.सदाशिव पाचपुते, शिरूरचे बाबुराव पाचर्णे आदींचा प्रचार केला. २०१४ आणि २०१९ मध्ये उमेदवारीसाठी मुलाखत दिली. पक्ष आपली निष्ठा आणि काम पाहून न्याय देईल.

– सुवर्णा पाचपुते

भाजप नेत्या, श्रीगोंदा नगर मतदारसंघ

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment