ahmednagar news: फिनिक्स फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रभर ओळख - आ.लहू कानडे; के.के.त्रिमुखे प्रतिष्ठानच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा गौरव - Rayat Samachar

ahmednagar news: फिनिक्स फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रभर ओळख – आ.लहू कानडे; के.के.त्रिमुखे प्रतिष्ठानच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा गौरव

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
69 / 100

अहमदनगर | ३० सप्टेंबर | प्रतिनिधी

ahmednagar news सामाजिक संस्था ह्या अनेकांच्या मदतीसाठी काम करत असतात. ज्या संस्था सातत्याने काम करतात त्यांची ओळख वेगळी असते. गरजू व्यक्तींसाठी काम करणे म्हणजे ईश्‍वराची सेवा करणे होय. गेल्या ३२ वर्षांपासून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे हे गरजू रुग्णांसाठी काम करतात. निस्वार्थीपणे ते हे काम करत असून कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक काम केल्यानेच त्यांच्या फिनिक्स फाऊंडेशचे नाव महाराष्ट्रभर झाले असल्याचे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले.

के.के.त्रिमुखे प्रतिष्ठानच्या वतीने फिनिक्स फाऊंडेशनचे बोरुडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे, ज्येष्ठ शाहिर आहेर, ज्येष्ठ नागरीक सेवा संघाचे सुभाष त्रिमुखे, विठ्ठल राहिंज, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. राहूल त्रिमुखे आदी उपस्थित होते.

प्रास्तविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे म्हणाले, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्र शिबीरातुन हजारो गरजू रुग्णांचे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले. सातत्याने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमुळे गरजूंची सेवा घडते. त्यांच्या कार्याची दखल घेवुन फिनिक्सचे जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात आल्याचे सांगून के.के.त्रिमुखे प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment