अहमदनगर | १७ सप्टेंबर | प्रतिनिधी
Cultural Politics गणेशोत्सव हा सण टिळकांनी समाजात एकीकरण, सामूहिकता निर्माण होऊन एकमेकांमधील संबंध चांगले व्हावे, यासाठी सुरु केला. सहजयोग ध्यानसाधना केल्यामुळे आपणास मनःशांती मिळून आपसातील संबंध दृढ होतात. ध्यानसाधना केल्यामुळे सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन माजी नगरसेविका विणा श्रीनिवास बोज्जा यांनी केले. विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंडहोम प्री प्रायमरी स्कुलमधे श्री गणेशोत्सवानिमित्त ‘मोदक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरू वीणा बोज्जा बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे, स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुचिता भावसार होत्या. प.पू.माताजी श्रीनिर्मलादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्था संचालक रुपाली रोहोकले, पारगावकर उपस्थित होते.
मोदक बनविण्याच्या स्पर्धेत पालकांनी तसेच परिसरातील महिलांचा सक्रीय सहभाग होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीषा लोखंडे, द्वितीय अंजना डेंगळे व तृतीय क्रमांक आराध्या पवार यांना देण्यात आला. विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापिका उषा गरड यांनी सूत्रसंचालन, उपमुख्याध्यापिका संगीता गांगर्डे यांनी पाहुण्याचे स्वागत तर पर्यवेक्षक दिपाली हजारे यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या शिक्षिका रूपाली जोशी, पूजा चव्हाण, आरती हिवारकर, अर्चना चव्हाण, वैष्णवी नजन, निकिता पाळंदे, सीमा हिवाळे व पालकवर्ग उपस्थित होता.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.