पाथर्डी | २१ऑगस्ट | राजेंद्र देवढे
तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालय, कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार, जि.बीड, कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी, महाराजा जे.पी.वळवी कला, वाणिज्य आणि व्हि.के.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगाव ता. नंदुरबार यांच्या प्राणिशास्त्र विभाग education यांच्यासह ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.अभय शुक्ला, डॉ.सब्यसाची चटर्जी व गिता महाशब्दे यांची व्याख्याने संपन्न झाली.
दरवर्षी १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान, प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने सामंजस्य करारांतर्गत उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ता.१९ ऑगस्ट रोजी सर रोनाल्ड रॉस यांना मिळालेल्या नोबेल पारितोषकाच्या स्मृतीनिमित्त आरोग्य विषयक जनारोग्य अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.अभय शुक्ला यांचे महाराष्ट्राचा आरोग्य जाहिरनामा या विषयावर, अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये येणारी आव्हाने’ या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रो फिजिक्स बंगळुरू येथील शास्त्रज्ञ डॉ.सब्यसाची चटर्जी यांचे तर कै.हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.राजाभाऊ कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त व स्व. दादापाटील राजळे यांच्या जयंतीनिमित्त ‘सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण’ या विषयावर निर्मिती शिक्षण फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.गिता महाशब्दे व्याख्यान संपन्न झाले.
या व्याख्यात्यांनी अभ्यासपूर्ण व सोप्या भाषेमध्ये आपले विषय समजावून सांगितले. चारही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्क्रीन उपलब्ध करून ऑनलाईन व्याख्यान दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ.विश्वास खंदारे, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य डॉ.राजधर टेमकर, प्राचार्य डॉ.संजय गायकवाड तर आयोजक प्रा.डॉ.तन्वीर पठाण, प्रा.डॉ.संतोष रणखांब, प्रा.डॉ.अतुल चौरपगार, प्रा.डॉ.सुनील शिंदे यांच्यासह ए.आय.पी.एस.एन.चे सर्व सदस्य उपस्थित होते. तंत्र सहाय्यक म्हणून प्रा.अभिजित निर्वळ, प्रा.महेश गोरे, प्रा.निता रसाळ, प्रा.प्रज्ञा बारबोले, प्रा.अनिता जिंतुरकर, प्रा.प्रविणकुमार पवार यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
रयत समाचार हे अंधश्रद्धा निर्मूलन, वस्तुनिष्ठ, सामाजिक ऐक्य, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बातम्यांना प्रकाशित करण्यासाठी प्राधान्य देणारे दैनिक आहे, अशा प्रकारचे या देशातील कष्टकरी आणि सामान्य नागरिक या घटकांना यथोचित प्रसिद्धी देणारे पत्रक असून स्वातंत्र्यपूर्व काळात, कीर्ती आणि तत्कालीन स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या मतांना प्रसिद्धी देणाऱ्या दैनिकांची आठवण करून देणारे हे वृत्तपत्र आहे.
या वृत्तपत्राला सुधारणावादी आणि पुरोगामी लोकांनी पाठबळ आवश्यक आहे.
रयत समाचार चे संपादक व त्यांची सर्व टीम ज्या पद्धतीने काम करत आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
या वृत्तपत्राला लाख लाख धन्यवाद…..!!!
आभार, सर. आपले प्रोत्साहन महत्वाचे आहे