अहमदनगर | १६ ऑगस्ट | विजय मते
भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण झाली. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांना फासावर लटकताना, इंग्रजांच्या गोळ्या झेलताना शेवटचा शब्द होता तो म्हणजे “वंदे मातरम” त्यामुळेच ‘वंदे मातरम’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ब्रीदवाक्य ठरले, असे cultural politics प्रतिपादन राजेंद्र कटारिया यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाअुलबुधे शैक्षणिक संकुलात भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी कटारिया यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. याप्रसंगी उमेश कोठाडिया, सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे रामभाऊ बुचकूल, आर.ए.देशमुख नाना, प्रा.दादासाहेब भोईटे, साई पाअुलबुधे, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्य डॉ.श्याम पंगा, डॉ.वेणू कोला, प्राचार्या अनुराधा चव्हाण, सविता सानप, सुचेत्रा डावरे, प्राचार्य संदीप कांबळे, प्राचार्य भरत बिडवे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कटारिया पुढे म्हणाले स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजी जुलमी राजवट नागरिकांनी एकत्र येऊन उलथवून लावली. इतिहासापासून ते ऑलिंपिंकपर्यंत भारताने कशी मजल मारली याची माहिती दिली. भाषण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांची नावे सांगा असे म्हणताच असंख्य विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिली. हे ऐकून कटारिया यांनी समाधान व्यक्त केले. ऑलिंपिक स्पर्धेत पदके मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योजक उमेश कोठाडिया म्हणाले की, आज जो तिरंगा आपण अभिमानाने फडकवितो तो १९०४ साली भगिनी निवेदिता यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाची रूपरेषा तयार केली. आणि १९०७ साली बर्लिन येथे वंदे मातरम असलेला भारताचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अनिता सिद्धम यांनी श्रीनाथ विद्या मंदिर विद्यालयाचा शैक्षणिक आढावा घेतला. विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लेझीम पथकाच्या तालावर देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केल्याने उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे कौतुक केले. सुत्रसंचालन देविदास बुधवंत तर आभार दिपक परदेशी यांनी मानले.