history: ‘कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी राजे समजून घेताना’ इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान; १८ ऑगस्ट रोजी माऊली सभागृहात होणार मुक्तसंवाद

अहमदनगर | १० ऑगस्ट | दिपक शिरसाठ

छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे गाढे history अभ्यासक, ‘शोध भवानी तलवारीचा’ ग्रंथाचे लेखक, प्रसिद्ध इतिहास संशोधक तथा लेखक इंद्रजित सावंत हे रविवारी ता. १८ रोजी अहमदनगर येथे येणार आहेत. ‘कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी राजे समजून घेताना…’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानानंतर ते उपस्थितांसोबत मुक्त संवादही साधणार आहेत.

येत्या रविवारी ता. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते ७.०० वाजता सावेडीरोडवरील माऊली सभागृह या ठिकाणी कार्यक्रम असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. छत्रपती शिवरायांचा मुद्देसूद इतिहास समजून घेण्यासाठी कार्यक्रमास यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन हृदयरोग तज्ञ डॉ.धनंजय वारे, हृदयरोग तज्ञ डॉ.महेश जरे, ‘अक्षरमानव माऊली सेवा’चे डॉ.राजेंद्र धामणे, मधिंदु ऑप्टिकल्स’चे डॉ.रविकांत पाचारणे, रहेमत सुलतान फाऊंडेशन, रयत समाचार परिवार यांनी केले आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *