कोल्हार | प्रतिनिधी
श्रमिक कष्टकरी जनतेचा आवाज असलेले dear comrade लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती कोल्हारमधे उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस भगवतीमाता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी तथा भाऊसाहेब दादा खर्डे पा., डॉ.श्रीकांत बेद्रे, प्रवरा बँकेचे माजी व्हा.चेअरमन अशोक असावा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कोल्हारचे उपसरपंच गोरक्ष खर्डे पा., विनोद गुगळे, शाम लोखंडे, धनंजय लोखंडे, काळुराम बोरुडे, विखे पाटील साखर कारखान्याचे मा. संचालक बाबासाहेब दळे, दगडू बोरुडे, दशनाम गोसावी समाजाचे प्रवेशाध्यक्ष शामभाऊ गोसावी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी सुरेश पानसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भाकपचे कॉ. सुरेश पानसरे यांनी अण्णाभाऊंच्या विचार व जीवनमुल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. एस.आर.बी. न्युजचे संतोष बोरुडे तसेच अशोक असावा, शामभाऊ गोसावी यांनी अण्णाभाऊंच्या जिवनावर मनोगत व्यक्त केले. अरुण बोरुडे यांनी सुत्रसंचालन केले. सर्व उपस्थितांच्या अण्णाभाऊंच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.