जामखेड | रिजवान शेख, जवळा
आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाने व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व शारदा पणन महिला पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील women power महिला बचतगटांना कर्ज वितरण करण्यात आले. जवळका गावात पाच महिला बचतगटांसाठी पाच लाखाचे कर्ज वितरण केले. सोनेगावातील सहा बचतगटाला सहा लाख. वाकी गावात एक बचतगटासाठी दोन लाख पन्नास हजार. लोणी गावात तीन गटासाठी दहा लाख पन्नास हजार. सरदवाडी येथे तीन गटाकरीता तीन लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले.
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व शारदा महिला पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या दोन वर्षात दहा कोटी रुपये कर्ज बचतगटांना वितरीत केले. गेल्या पंधरा ते वीस दिवसात जामखेड तालुक्यात पन्नास लाखाचे कर्ज बचतगटांना वाटप झाले. आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाने आई सुनंदाताई पवार यांच्या हस्ते तालुक्यात सत्तावीस लाखाचे कर्जवापट झाले. त्या निमित्ताने जवळा येथे सुनंदाताई पवार यांचा महिला हितगुज व कर्ज मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमात जवळा गावातील दोन बचतगटांना चार लाख वीस हजार कर्ज वितरीत केले.
सुनंदा पवार यांनी सांगितले की, मिळालेल्या कर्ज रकमेतून बचतगटातील महिलांनी व्यवसाय सुरू करावेत. जेणेकरून स्वतःच्या प्रपंचासाठी हातभार लागेल. या हेतूने हा उपक्रम हाती घेतले आहे.
कार्यक्रमासाठी राजश्रीताई मोरे, ज्योती सुर्वे यांच्यासह गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमासाठी जवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे संजय आव्हाड, दीपक पाटील, अविनाश पठाडे, किरण कोल्हे, नय्युम शेख, योगेश सपकाळ, चांदपाशा शेख, जयश्री वाळुंजकर तसेच बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.