पाथर्डी | पंकज गुंदेचा
Pathardi तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशी Aushadhi Ekadashi निमित्त दिंडी सोहळा संपन्न झाला. मुख्याध्यापक गोरक्षनाथ रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी बनवून टाळ मृदुंग व लेझीम तसेच भगव्या पताका, झेंडे हाती घेऊन समाजाला दिंडीद्वारे वारकरी धर्माचा एकात्मतेचा संदेश दिला. यामध्ये विठ्ठलाची भूमिका समृद्धी सचिन पवार तर रुक्मिणीची भूमिका श्रावणी नवनाथ पठाडे यांनी साकार केली. गावामध्ये अनेक ठिकाणी मान्यवरांनी दिंडीचे उत्साहात स्वागत व पूजन केले.
दिंडीसोहळा यशस्वितेसाठी Teacher विजय भताने, भागवत आव्हाड, शंकर बरकडे, शिवाजी लवांडे, राजेंद्र वांढेकर, सचिन पवार, अमोल लवांडे, अभयसिंह चितळे, विद्या गोबरे, राजश्री दुशिंग, किर्ती भांगरे, मनिषा जाधव, तबस्सुम शेख, मंगल लवांडे, जयश्री वाघमोडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संजय गायकवाड, भाऊसाहेब औसेकर, संजय आठरे, संजय शिंदे, प्रशांत अकोलकर आदींनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा : कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची – शाहू छत्रपती