अहमदनगर | प्रतिनिधी
येथील राज्यभर गाजत असलेल्या अर्बन बँक मल्टीस्टेट २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्यातील आरोपी पुण्याचा प्रसिध्द आगरवाल बिल्डरच्या जामिन केस संदर्भात. चुकीच्या अर्जावरून मुळ न्यायाधिश सित्रे यांच्याकडून केस ट्रान्सफर केल्याच्या मुद्द्यावर ता. ९/७/२०२४ रोजी कामकाज होणार आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. यार्लगड्डा यांच्याच न्यायालयात कामकाज चालणार असून अर्जदार स्वतः म्हणणे मांडणार आहेत. आगरवाल यांच्याबाजुने ॲड. पी.एस. डापसे हे कामकाज पहाणार आहेत.
ज्या तक्रारदाराच्या ‘बोगस’ मागणीपत्रावरून ‘या’ एमपीआयडी केसचे मुळ न्यायाधीश सित्रे यांच्याकडून संपूर्ण कामकाज होऊन निकालावर असलेली केस काढून दुसरे न्यायाधिशाकडे दिली. त्या संग्राम कोतकर यांनी देलेल्या पत्रावर काय निणर्य होतो. हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.