मुंबई | गुरूदत्त वाकदेकर | २८.६.२०२४
एस टी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांची बैठक पार पडली त्यात सर्वानी आपल्या न्याय व हक्कासाठी एकत्रित लढण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्री व प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरले. संघटनांच्या वतीने लवकरच प्रशासनला मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे बैठकीत ठरले.
बैठकी दरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने राज्यसरकारी कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांना वेतन मिळायलाच पाहीजे तसेच प्रलंबीत महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक,रू ४८४९/- कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप झाले पाहिजे. नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या रू ५०००/-, ४०००/-, २५०० ऐवजी सरसकट ५००० हजार रु मिळावेत. सर्व रा.प. कर्मचा-यांना इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू केली पाहिजे. खाजगीकरण बंद करायला हवे. त्याच बरोबर सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द केली पाहिजे,जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाकून स्वमालकीच्या नवीन बस खरेदी केल्या पाहिजे. चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह करा. वेळापत्रकातील त्रुटी दूर करा, सेवानिवृत्त झालेल्या व होणा-या रा.प. कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास देण्यात यावा आदी मागण्या सरकारकडे करण्याचे ठरले.
सरकारने प्रतिसाद न दिल्यास ता. ९ व १० जुलै रोजीच्या विधीमंडळाच्या अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन व ता. ४ जुलै २०२४ रोजी एसटी को. ॲाप. बॅंकेच्या अनोगोंदी कारभाराविरुद्ध सहकार आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले.
सर्व मागण्या विधानसभेची आचारसंहीता लागण्यापूर्वी मंजूर झाल्याच पाहीजेत यासाठी यल्गार पुकारण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष प्रदिप धुरंधर, चिटणीस आर.के. पाटील, कास्ट्राईबचे सरचिटणीस सुनिल निरभवने, प्र सचीव एम. जी. कांबळे, प्र. अध्यक्ष गौतम कांबळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, राज्य मिडीया प्रमुख शहादेव (माया) डोळस, राष्ट्रीय एसटी कामगार कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, संतोष गायकवाड, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे संघटक सचिव संजय पोवार, प्रकाश निंबाळकर, MMK FEDERATION चे सरचिटणीस बंडू फड, मुख्य सचिव विजयकुमार वाघमारे, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस दादाराव डोंगरे, कार्याध्यक्ष अरूण विरकर, बहुजन रा.प. कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग वाघमारे, राज्य परिवहन यांत्रिक संघटना अशोक टोंगळे, योगेश इंगळे, ज्ञानेश्वर राणे, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन सरचिटणीस विनोद गजभिये, कोषाध्यक्ष सुरेश तांबे, बहुजन परिवहन अधीकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. दिपक शिंदे, सरचिटणीस प्रमोद खरात आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : ईपेपर रयत समाचारची संबंधित बातमी वाचा