हिंगोली | प्रतिनिधी | २८.६.२०२४
वसमत तालुक्यातील शिरळे येथील शेतकरी बालाजी पुंडगे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात हळद लावण्यापूर्वी सरी काढताना बैल उपलब्ध नसल्याने आपला भाऊ व मुलाला कोळप्याला जुंपलेला एक व्हीडिओ साम टिव्हीच्या माध्यमातून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाहण्यात आला होता. यावर त्यांनी तात्काळ आपले सहकारी बी.डी. बांगर यांच्या सहाय्याने दोन एकर शेती असलेल्या बालाजी पुंडगे यांना थेट शेतात बांधावर बैलजोडी भेट दिली. त्याचबरोबर त्यांना कृषी विभागाकडे ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यासही सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना मुंडे म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा, निसर्गाची अवकृपा या सगळ्या चक्रात हे सरकार सर्वार्थाने शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी कटीबद्ध आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.