प्रथमच तीन कॉम्रेड मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल; अहमदनगरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेत उमटवला ठसा - Rayat Samachar

प्रथमच तीन कॉम्रेड मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल; अहमदनगरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेत उमटवला ठसा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर (विजय मते) १६.६.२०२४

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ९० कि.मी. अंतराच्या कॉम्रेड रनरमध्ये अहमदनगरच्या धावपटूंनी डर्बन शहरात अतिशय खडतर व शारीरिक कसोटी पाहणाऱ्या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याचा ठसा उमटवला असून, जिल्ह्यासाठी प्रथम तीन कॉम्रेड मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल मिळविले. ही कॉम्रेड मॅरेथॉन जगातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉन मानली जाते.
या मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगरचे २०२४ च्या कॉम्रेडसाठी चार जण सहभागी झाले होते. या चारही धावपटूंनी वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये रवि पत्रे पहिल्यांदाच सहभागी होऊन वेळेत मॅरेथॉन पुर्ण केली. तसेच दुसऱ्यांदा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यास स्पेशल मेडल मिळत असते. यावेळी योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय या तिघांनी दुसऱ्यांदा सहभाग नोंदवून बॅक टू बॅक हे वेळेत पूर्ण करुन मेडल पटकाविले. हे मानाचे मेडल मिळाले ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सर्वांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेत अहमदनगरच्या नावाचा ठसा पुन्हा उमटविला आहे.
या चारही धावपटूंना अहमदनगर रनर्स क्लब व अहमदनगर सायकलिंग क्लब यांची मोलाची साथ मिळाली. या सर्वांचा गौरव फिरोदिया यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. क्रीडा विभागातून अभिनंदनाचा वर्षाव या चारही धावपटूंवर होत आहे.

Share This Article
Leave a comment