अहमदनगर (प्रतिनिधी) १६.६.२०२४
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्र एप्रिल मे २०२४ मधील शास्त्रीय संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शिवरंजन संगीतालयाचा विद्यार्थी मल्हार वाघ हा तबलावादन प्रारंभिक परीक्षेत विशेष योग्यतेसह केंद्रात सर्वप्रथम आला.
विद्यालयाचे संचालक तबला शिक्षक सुरज शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. मल्हार हा प्राजक्ता व प्रकाश विक्रम वाघ यांचा मुलगा असून ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम शाळेचा इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



