मुंबई (प्रतिनिधी) १६.६.२४
आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत सामाजिक कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने नव्या ऑडिओबुकमध्ये खास साहित्यरसिक श्रोत्यांसाठी आणली आहे.
त्या काळातल्या वास्तवावर आधारित कल्पनांचा सुरेख अनुभव या कादंबरीमध्ये आला असून माफिया टोळ्यांमुळे निर्माण झालेल्या या काळातील वर्तमानातल्या सामाजिक जीवनाचे चित्र नाट्यात्मक व गतिमानतेने अचूक साधले गेल्याने ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमध्ये अभेनेत्री सीमा देशमुख यांच्या स्पष्ट आवाजात ऐकताना श्रोते तल्लीन होतात.
‘सव्यासाची’ या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने नेमके काय काय भोगले याची गाथा कथन करण्यात आली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळली गेलेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये राजकारणाचा झालेला अध:पात आणि गुन्हेगारीकरण, धार्मिक तेढ वाढवत त्याचा धंदा करणारे दलाल आणि यासोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पहात फरफटत जाणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकाय कादंबरीत घडते. सर्वव्यापकता एवढेच काही या कादंबरीचे वैशिष्ट्ये नाही. या परिवर्तनाच्या काळात सामील झालेल्या सर्वच भल्याबुऱ्या पात्रांचे, त्यांच्या जीवनाचे आणि घटनांचे चित्रण अत्यंत सहृदयतेने लेखक संजय सोनवणी यांनी केल्याने ती स्टोरीटेलवर ऑडिओबुकमध्ये ऐकताना साहित्यरसिक श्रोते दंग होतात. एकाच प्रवाहात कोमलता, कारुण्य आणि नृशंसता यांचा मिलाफ साधताना सर्वच घटनांची सर्वांगीण मिमांसाही केली असल्याने तटस्थ सहृदयतेचेही दर्शन घडविण्याची किमया या कादंबरीत लेखकाने साधली गेली आहे. ‘सव्यसाची’च्या रुपात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील वर्तमानाचा आरसा दाखिविला गेला आहे.
‘सव्यसाची’ ही प्रसिद्ध सामाजिक कादंबरी लिहिणारे प्रख्यात लेखक संजय सोनवणी हे मराठी साहित्यविश्वातील आधुनिक काळातले महत्त्वाचे साहित्यिक, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकाराद्वारे हात घालत विपुल साहित्य रचना केली आहे. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन नैतिक समस्यांबद्दलचे तसेच आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले चिंतनपर असून त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देते. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत.
मराठी साहित्यविश्वात इतिहास घडविणारी ही लोकप्रिय कादंबरी ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.