नगर तालुका (प्रतिनिधी) १५.६.२०२४
तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पिंपळगाव तलावातील पाण्यावरच अवलंबून आहे. हा तलाव अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. पुर्वी या तलावातून अहमदनगर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. तलाव म्हणजेच छोटे धरण बांधण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले खासदार उत्तमचंद रामचंद बोगावत यांनी पाठपुरावा केल्याचा इतिहास आहे. कामाची पहाणी करण्यासाठी खासदार बोगावत हे सायकलवर येत असल्याचे लोक सांगतात.
मागील पाच-सहा दिवसांपासून जेऊर पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
(छायाचित्र – खासेराव साबळे)
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.