बारामती | ६.८ | रयत समाचार
(Samarth Lakhapati Skating) येथे आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या इयत्ता सातवी (इंग्रजी माध्यम) मधील विद्यार्थी समर्थ चेतन लखापती याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. अवघ्या चार महिन्यांच्या सरावानंतर १२ वर्षांखालील वयोगटातील सुमारे ४० स्पर्धकांमध्ये टॉप-१० मध्ये स्थान मिळवत त्याने कांस्यपदक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळवून शाळेसह अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
(Samarth Lakhapati Skating) या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ७०० ते ८०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अहिल्यानगर मॅरेथॉन स्केटिंग क्लबचे ७० खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. ४ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत क्लबला ३५ सुवर्ण, २० रौप्य आणि १५ कांस्यपदके, तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे मिळवून दिली.
(Samarth Lakhapati Skating) विशेष म्हणजे, २४ जिल्ह्यांतील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत अहिल्यानगर मॅरेथॉन स्केटिंग क्लबने तब्बल सहा फूट उंचीची महाराष्ट्र राज्य विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या यशामुळे क्लबच्या खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समर्थ हा चेतन लखापती यांचा सुपुत्र असून, ते आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. समर्थच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
या यशामागे क्लबचे अध्यक्ष गोरख धात्रक तसेच प्रशिक्षक सुशील केदार आणि आदित्य पालवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे समर्थने सांगितले. तसेच प्रत्येक स्पर्धा आणि विविध परीक्षांसाठी आजोबा मुकुंद लखापती यांची प्रेरणा आणि आईवडिलांचे सातत्यपूर्ण पाठबळ लाभत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


