पुणे | २८.७ | रयत समाचार
(Atul Pethe Grant) प्रख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांना प्रा. कुंदा (अंबू) अच्युत दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दाभोलकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या सहयोग निधीतून ₹5 लाखांचा आर्थिक सहयोग जाहीर करण्यात आला आहे. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पेठे यांनी ही पोस्ट स्वतःच्या अभिनंदनासाठी नसून, समाजातील विधायक कार्याला मिळणाऱ्या पाठबळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.
(Atul Pethe Grant) पेठे यांनी सांगितले की, अनेक जण त्यांना सातत्याने प्रायोगिक नाटक आणि विविध सांस्कृतिक उपक्रम कसे राबवता, आर्थिक बळ कुठून मिळते, असा प्रश्न विचारतात. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्वतःचे आणि पत्नीचे काटकसरीचे जीवन, प्रामाणिक प्रयत्न आणि समाजावरील विश्वास यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे नमूद केले.
(Atul Pethe Grant) त्यांनी ज्येष्ठ रंगधर्मी बादल सरकार यांचे “टिकून राहिले तर सारे शक्य आहे” हे वाक्य आपल्या आयुष्याचा आधार असल्याचे सांगितले. निराश न होता सातत्याने काम करत राहिल्यास समाजातून मदतीचे हात आपोआप पुढे येतात, असा त्यांचा स्वानुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
दाभोलकर कुटुंबीयांनी प्रा. कुंदा अच्युत दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन कोटी रुपयांचा सहयोग निधी उभारला असून, पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या दुसऱ्या टप्प्यात सहा व्यक्ती आणि दहा संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अतुल पेठे यांचाही समावेश आहे. त्यांना नाट्यक्षेत्रातील कार्यासाठी ₹5 लाखांचा सहयोग निधी देण्यात आला आहे.
या मदतीमुळे आपल्या नाट्यप्रयोगांसाठी नव्या संकल्पना राबविण्याचे बळ मिळाल्याची भावना पेठे यांनी व्यक्त केली. गेल्या ४५ वर्षांच्या प्रवासात वाईट अनुभवांपेक्षा चांगले अनुभव अधिक आले असून, अनेक व्यक्ती आणि संस्थांनी वेळोवेळी आर्थिक व नैतिक पाठबळ दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी डॉ. श्रीराम लागू, नसिरुद्दीन शहा-रत्ना पाठक शहा, अमोल पालेकर, किशोर कदम यांच्यासह अनेक व्यक्ती, संस्था आणि दाभोलकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. पेठे यांनी शेवटी, “या समाजात आपण सृजनशील आणि अर्थपूर्ण काम करू शकतो, ही भावना अशीच वाढत राहो,” अशी आशावादी भावना व्यक्त केली.
Atul Pethe Grant दाभोलकर कुटुंबीयांच्या सहयोग निधीबद्दल माहिती देताना ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे
दाभोलकर कुटुंबीयांच्या सहयोग निधीतून ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांना ₹5 लाखांची मदत. ‘समाजाच्या विश्वासामुळेच सृजनशील काम शक्य होते,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. #AtulPethe #MarathiTheatre #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


