Art | कलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; समांतर रंगभूमी कलावंत संघटना शिष्टमंडळाची संचालक पांडे यांची भेट - Rayat Samachar

Art | कलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; समांतर रंगभूमी कलावंत संघटना शिष्टमंडळाची संचालक पांडे यांची भेट

rayatsamachar
2 Min Read

मुंबई | १५.६ | रयत समाचार

(Art) कलावंत, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या व समस्यांबाबत समांतर रंगभूमी कलावंत संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई येथे संचालक पांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कलावंतांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचारविनिमय झाल्याची माहिती डॉ. श्याम शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

(Art) अधिक माहिती देतान शिंदे म्हणाले, संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत असतानाही सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्नांबाबत त्यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टीकोन याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

(Art) बैठकीदरम्यान राज्य नाट्यस्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांना निर्मिती खर्च, अनामत रक्कम, प्रवास खर्च तसेच इतर आर्थिक सहाय्य वेळेत मिळावे, बक्षीस वितरण समारंभ निश्चित कालावधीत आयोजित व्हावेत, सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, समन्वयक नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी तसेच सांस्कृतिक संस्थांना मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानात वाढ करावी, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सचिव मीनल जोगळेकर यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांच्या कामकाजाबाबत त्यांची अभ्यासू दृष्टी, आत्मीयता आणि संस्थांच्या प्रक्रियांना गती देण्यासाठी असलेली सकारात्मक भूमिका याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. संस्थांना आवश्यक असणाऱ्या शिफारस पत्रांच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळावा, यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.

तसेच नाट्य अधीक्षक मिलिंद बिर्जे आणि सहसंचालक बलखंडे यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.
या बैठकीस समांतर रंगभूमी कलावंत संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, संघटक ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हंडोरे, सचिव दिनेश कवडे तसेच देविदास येंगडे उपस्थित होते.

कलावंत, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेचे प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading