पाथर्डी | १०.६ | रयत समाचार
(World news) येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय, आदिनाथनगर मधील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुलकुमार रमाकांत चौरपगार यांना बँकॉक (थायलंड) येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय ‘क्लायमेट स्मार्ट नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट फॉर सस्टेनेबल ॲग्रीकल्चर अँड अलाइड सायन्सेस’ परिषदेत ‘एक्सलन्स इन एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड-२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(World news) हा पुरस्कार डॉ. बिनय कुमार चक्रवर्ती (ढाका, बांगलादेश), डॉ. रमेश राठोड (रायचूर, कर्नाटक), डॉ. उपेंद्र सिंग (जयपूर, राजस्थान), डॉ. जोगिंदर सिंग, डॉ. अनंत कुमार (अध्यक्ष, ए.टी.डी.एस., गाझियाबाद, उत्तर प्रदेश) तसेच डॉ. देवांशु गुप्ता (शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, कोलकाता) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह देण्यात आला.
(World news) पर्यावरण, प्राणीशास्त्र आणि शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. चौरपगार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

