मिरर न्यूज
अहमदनगर | ९.६ | रयत समाचार
(Press) पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी अहिल्यानगर शहराचा इतिहास जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे शहरात उचित स्मारक व्हावे, अशा भावना मान्यवरांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केल्या.
(Press) शहरातील पत्रकार व सीएसआरडी यांच्या वतीने दिवंगत भूषण देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘सीएसआरडी’ महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. महापौर ज्योती अमोल गाडे, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, माजी आमदार लहू कानडे, पद्मश्री पोपट पवार, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सुभाष गुंदेचा यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती. देशमुख यांचे कुटुंबियही यावेळी उपस्थित होते.
(Press) सभेत बोलताना निमसे म्हणाले, शहराच्या ऐतिहासिक वास्तूंची ख्याती सर्वदूर पोहोचविण्यासाठी देशमुख सतत प्रयत्नशील होते. आचार्य नरेंद्र देव यांनी येथील भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्यानंतर पहिले ध्वजारोहण केले. देव यांची बुद्धीझमवर लिहिलेले पुस्तक हे या किल्ल्यात असावे यासाठी देशमुख यांनी मोठे प्रयत्न करुन ते पुस्तक मिळविले. याचे आपण साक्षीदार आहोत.
पोपट पवार म्हणाले, देशमुख यांचे शहरात उचित स्मारक होणे आवश्यक आहे. कारण त्यांनी इतिहास जपण्यासाठी खूप धडपड केली. महापालिकेच्या जुन्या कॉन्सिल हॉलचे पुनरुज्जीवन करण्याचे त्यांचे स्वप्न होते ते पूर्ण व्हायला हवे. पठारे म्हणाले, भूषण यांनी पत्रकारिता, इतिहास, पत्रकारितेचे प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिले. शिल्पकार प्रमोद कांबळे, जयंत येलूलकर यांनीही देशमुख यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृती जतन करण्याची गरज प्रतिपादीत केली.
यावेळी सय्यम मरियम, सुभाष वारे, ज्ञानेश कुलकर्णी, अरविंद पारगावकर, पवन नाईक, रामदास ढमाले, शिल्पा रसाळ, डॉ. सुधा कांकरिया, प्रकाश पाटील, अनिरुद्ध देवचक्के, राजू इनामदार, आबासाहेब गाडे, अमृत मुथा, सतीश गुगळे, सीए अभयकुमार कटारिया, सीए राजेंद्र काळे, अजय धोपावकर, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सभेला सतीश कुलकर्णी, सुधीर लंके, सॅम्युअल वाघमारे सर, दिपक शिरसाठ, विठ्ठल लांडगे, श्रीराम जोशी, सतीश डेरेकर, नितीन पोटलाशेरु, लैलेश बारगजे, संध्या मेढे, शाम असावा, शिवाजी नाईकवाडी, मकरंद घोडके, रवींद्र सातपुते, बाबा जाधव, अर्शद शेख, मन्सूर शेख, सुरेखा आडम, शिवाजी साळवे, सचिन चोभे, अन्सार सय्यद, उबेद शेख, वीणा दिघे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालक सुदाम देशमुख यांनी केले. विजयसिंह होलम यांनी आभार मानले.
कौन्सिल हॉलच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव : महापालिकेचा जुना कौन्सिल हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यांपासून देशमुख खूप व्यथित होते. या हॉलचे नव्याने सुशोभिकरण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हा हॉल देशमुख यांच्या नावाने सुशोभित करता येऊ शकतो. त्यासाठी त्यांचा परिवार दहा लाख रुपये देणगी देईल, असे स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. माजी आमदार लहू कानडे यांनीही या उपक्रमासाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली.
अहिल्यानगरचा इतिहास बांग्लादेशपर्यंत : स्नेहालयच्या वतीने भारत बांगलादेश यात्रा काढण्यात आली. त्यावेळी देशमुख यांनी बांगलादेशात तेथील मंत्र्यांना देखील अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यांचा व मराठ्यांचा इतिहास सांगितला, ही आठवण गिरीश कुलकर्णी यांनी सांगितली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


