Press | महिलांच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा; पायाभूत सुविधांवर भर देत बदलत्या भारताची चर्चा

Women’s Sports in India अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्र

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ६.६ | गुरूदत्त वाकदेकर

(Press) महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर, संधींवर आणि पुढील आव्हानांवर चर्चा करणारा प्रेरणादायी आणि विचारमंथनात्मक कार्यक्रम नुकताच वानखेडे स्टेडियमवर उत्साहात पार पडला. बीबीसी/सीएनआर (BBC/CNR) यांच्या Women’s Sports in India अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या चर्चासत्रात क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला, अशी माहिती मराठी बीबीसी दिल्लीचे अभिजित कांबळे यांनी दिली.

(Press) भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू डायना एडुलजी आणि ऑलिम्पियन ललिता बाबर यांनी महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील बदलत्या मानसिकता, संघर्ष आणि यशस्वी वाटचालीबाबत आपले अनुभव मांडले. आजच्या तुलनेत पूर्वी महिलांना क्रीडा क्षेत्रात किती मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते आणि आता परिस्थिती कशी बदलत आहे, यावर त्यांनी भाष्य केले.

(Press) यावेळी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्रात आणण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रशिक्षण केंद्रे आणि संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलींना समान संधी उपलब्ध झाल्यास भारताचा क्रीडा नकाशा अधिक व्यापक होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी एकमताने सांगितले की, महिलांच्या क्रीडा क्षेत्रात मोठा बदल झाला असला तरी अजूनही प्रवास बाकी आहे. सामाजिक दृष्टिकोन बदलणे, सुविधा वाढवणे आणि सातत्यपूर्ण पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

खेळ बदलतोय, मानसिकता बदलतेय; आता गरज आहे संधी वाढवण्याची, हा संदेश या चर्चासत्रातून ठळकपणे समोर आला.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading