जुन्नर | ३.५ | रयत समाचार
(Social) तालुक्यातील पिंपळवंडी गावाजवळील चाळकवाडी येथे आयोजित करण्यात आलेला ‘शिवांजली साहित्य महोत्सव’ सलग तीन दिवस मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. विविध कवी, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सांगता झाली.
(Social) या महोत्सवात पिंपळवंडी येथील सिध्दार्थ कसबे यांना ‘शिवांजली भूमिपुत्र सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
(Social) सन्मान स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिध्दार्थ कसबे म्हणाले, हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. या सुंदर आणि प्रेरणादायी क्षणांचे साक्षीदार होता आले, हे माझे भाग्य आहे.
यावेळी त्यांनी शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चाळक, कवी संदीप वाघोले, बाबासाहेब जाधव, संतोष जेडगुळे यांचे विशेष आभार मानले. तसेच, साहित्य आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा हा महोत्सव कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी सांगितले.
महोत्सवादरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम, काव्यवाचन, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरात साहित्यप्रेमींसाठी एक प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
