Culture | महिला मल्लानी गाजविला नेप्ती आखाडा; दर्दी प्रेक्षकांची तूफान गर्दी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नगर तालुका | २७.४ | रयत समाचार

(Culture) तालुक्यातील नेप्ती येथे ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती हगाम्याने यंदा प्रचंड रंगत आणली. दोन दिवस चाललेल्या यात्रेतील मुख्य आकर्षण ठरलेल्या या हगाम्यात देशातील नामांकित महिला व पुरुष मल्लांनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हा आखाडा महिला मल्लांनी गाजवला.

Culture

(Culture) आखाडा पाहण्यासाठी परिसरातील गावातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अवघ्या काही क्षणांत प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणाऱ्या झटपट कुस्त्यांनी आखाड्यात थरार निर्माण केला, तर प्रेक्षकांनीही उत्स्फूर्तपणे बक्षिसांचा वर्षाव करत मल्लांचे कौतुक केले.

(Culture) या जंगी हगाम्यात १ हजार रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या रंगल्या. जवळपास चार ते पाच तास चाललेल्या या कुस्ती स्पर्धेत विविध भागांतील मल्लांनी सहभाग घेतला.

Culture

प्रा.एकनाथ होले, उपसरपंच एकनाथ जपकर, वस्ताद वसंत पवार, पै.योगेश पवार, पै.मनोज फुले, पै.अनिल गुंजाळ यांनी पंच म्हणून जबाबदारीने सामने सुरळीत पार पाडले.
यंदाच्या हगाम्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला मल्लांचा उत्साहपूर्ण सहभाग. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्ती खेळणाऱ्या मुलींनीही आखाड्यात उतरून दंड थोपटत जोरदार झुंज दिली. त्यांच्या कुस्त्यांनीही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत रोमांचक वातावरण निर्माण केले.
 हगाम्याचे आयोजन माजी सरपंच विठ्ठल जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, सरपंच संजय अशोक जपकर, माजी पंचायत समिती सदस्य किसन होले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, चेअरमन सुरेंद्र होळकर, व्हा.चेअरमन सादिक पवार, माजी चेअरमन विलास जपकर,माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, दादू चौगुले, फारुक सय्यद, बंडू जपकर, संभाजी गडाख, बाबासाहेब होळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, जमीर सय्यद, ज्ञानेश्वर जपकर, अशोक जपकर, मच्छिंद्र होळकर, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, युवा नेते अतुल जपकर, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, विविध मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
एकूणच, नेप्ती येथील बिरोबा यात्रेतील कुस्ती हगाम्याने पारंपरिक खेळांची परंपरा जपत गावकऱ्यांना आणि कुस्तीप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading