Crime | दैवी शक्ती सिद्ध करा, 80 लाख घ्या; अंनिसचे धीरेंद्र शास्त्रींना पुन्हा खुले आव्हान - Rayat Samachar

Crime | दैवी शक्ती सिद्ध करा, 80 लाख घ्या; अंनिसचे धीरेंद्र शास्त्रींना पुन्हा खुले आव्हान

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नागपूर | २५.४ | रयत समाचार

(Crime) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS)ने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पुन्हा एकदा सार्वजनिक आव्हान दिले असून, त्यांच्या कथित दैवी शक्ती सिद्ध केल्यास तब्बल रूपये ८० लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. अंनिसचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

(Crime) त्यांनी सांगितले की, शास्त्री यांनी समितीने आयोजित केलेल्या दोन कठोर चाचण्या यशस्वीरित्या पार कराव्यात. या चाचण्यांमध्ये सीलबंद लिफाफ्यांमध्ये ठेवलेल्या १० व्यक्तींची नावे, त्यांच्या आई-वडिलांची नावे, वय आणि मोबाईल क्रमांक अचूक ओळखणे अपेक्षित आहे. तसेच शेजारच्या खोलीत ठेवलेल्या १० वेगवेगळ्या वस्तूंची अचूक ओळख पटवावी लागणार आहे.

(Crime) या संपूर्ण प्रक्रियेसाठी शास्त्री यांना रूपये ८ लाखांची ठेव रक्कम जमा करावी लागेल. चाचणीत अपयश आल्यास ही रक्कम जप्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संपूर्ण चाचणी प्रक्रिया नागपूर येथे व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडणार असून, दोन्ही बाजूंकडील पाच सदस्यीय समिती त्यावर देखरेख करणार आहे.
दरम्यान, प्रा. मानव यांनी राज्यातील वाढत्या अंधश्रद्धेबाबत चिंता व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचा आरोप केला. तसेच माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कुटुंबासह धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी या घटनेला गंभीर स्वरूपाचे असल्याचे म्हटले.
या आव्हानाला धीरेंद्र शास्त्री प्रतिसाद देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading