Education | खडक, खनिजे, जीवाश्मांचे अनोखे नमुने पाहण्याची संधी; शनिवारी २५ एप्रिल रोजी पुण्यात ‘भवताल’ तर्फे ‘दगडांच्या देशा’ प्रदर्शन 

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | २२.४ | रयत समाचार

(Education) महाराष्ट्र, भारत आणि एकूणच पृथ्वी समजून घ्यायची असेल, तर इथले खडक, खनिजे व जीवाश्म समजून घेणे आवश्यक आहे. हाच पृथ्वीवरील ठेवा पुणेकरांसमोर उलगडण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘भवताल’ संस्थेच्या वतीने येत्या शनिवारी ता. २५ एप्रिल रोजी ‘दगडांच्या देशा’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अभिजीत घोरपडे यांनी दिली.

(Education) घोरपडे यांनी सांगितले, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सभागृहात दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत हे अनोखे प्रदर्शन भरणार आहे. या आठवड्यात असलेल्या जागतिक वसुंधरा दिन ता. २२ एप्रिलनिमित्त साधून हे प्रदर्शन भरवण्यात आले.

(Education) प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन दुपारी ४ वाजता होणार आहे. खनिजे व जीवाश्मांचे ख्यातनाम संग्राहक एम.एफ. मक्की, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होईल. संग्राहक समी मक्की हे सहकार्य करत आहेत.
महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या ‘बेसाल्ट’ खडकाने व्यापलेला आहे. या लाव्हारसाच्या पोकळीत नैसर्गिक प्रक्रियेतून अत्यंत आकर्षक आणि स्फटिकमय खनिजे तयार होतात. ती जगभरातील भूवैज्ञानिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. विदर्भातील काही भागांत कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या डायनासोरची अंडी आणि प्राचीन वनस्पतींचे जीवाश्म आढळतात. ती जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा पुरावा ठरतात.
महाराष्ट्रातील खडक, खनिजे, जीवाश्मांबरोबरच देशाच्या इतर भागातील तसेच पृथ्वीवरील इतर ठिकाणचेही दुर्मिळ नमुने या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय दगडांची निर्मिती कशी होते? खडकांच्या पोकळीत स्फटिकासारखी खनिजे कशी तयार होतात? आणि कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीव दगडांच्या रूपात (जीवाश्म) कसे जतन झाले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील या प्रदर्शनातून मिळणार आहेत.
प्रदर्शन सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. भूविज्ञान जवळून अनुभवण्याची संधी या निमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading