Rip News | पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या उपनगराध्यक्षा शांताबाई सातव यांचे निधन; सेवा दलाच्या कार्यकर्त्या हरपल्या - Rayat Samachar

Rip news | पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या उपनगराध्यक्षा शांताबाई सातव यांचे निधन; सेवा दलाच्या कार्यकर्त्या हरपल्या

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पिंपरी-चिंचवड | १९.४ | रयत समाचार

(Rip news) पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षा तसेच राष्ट्र सेवा दलाच्या जेष्ठ कार्यकर्त्या शांताबाई सुदाम सातव (वय ८७) यांचे आज रविवारी ता. १९ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

(Rip news) शांताबाई सातव यांनी आपल्या कार्यकाळात समाजसेवेची अखंड परंपरा जपली. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योगदान दिले. पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. पत्रकार आश्विनी सातव-डोके यांच्या त्या आजी होत.

(Rip news) त्यांच्या पार्थिवावर सोमवारी ता. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरीगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर

 

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading