मुंबई | ६.४ | रयत समाचार
(Health) टीबीमुक्त भारताच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल उचलत, बोरिवली मेडिकल ब्रदरहुड या नवीन निक्षय मित्र संस्थेने ५ क्षयरोग (टीबी) रुग्णांना दत्तक घेत त्यांना आवश्यक पोषण सहाय्य देण्यास सुरुवात केली आहे.
(Health) याचबरोबर, सामाजिक बांधिलकी जपत नामांकित निक्षय मित्र डॉ. छाया बांगेरा यांनी त्यांच्या समर्थनातील टीबी रुग्णांची संख्या ३० वरून थेट ५० पर्यंत वाढवली असून, एप्रिल २०२६ पासून अतिरिक्त २० रुग्णांना सहाय्य मिळणार आहे.
(Health) शास्त्रीनगर येथील औषध निवारणालयात आज किट वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास डॉ. छाया बांगेरा, बोरिवली मेडिकल ब्रदरहुडचे अध्यक्ष डॉ. परेश दोषी, बोरिवली व दहिसर विभागाच्या डीटीओ डॉ. अर्चना चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय एसटीएस राजेंद्र गडे व टीबीएचव्ही अश्विनी सिंग यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळले.
टीबी रुग्णांच्या पुनर्वसनासाठी पोषण सहाय्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा उपक्रमांमुळे रुग्णांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आधारही मिळतो. ही पुढाकार निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
