अहमदनगर | २९.३ | रयत समाचार
(Public issue) अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 2 तासांत हवामान अचानक बदलण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
(Public issue) हवामान विभागाच्या माहितीनुसार, या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागात अचानक वाऱ्याचा जोर वाढू शकतो. त्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, हलक्या वस्तू उडून जाणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Public issue) नागरिकांसाठी सूचना देण्यात येत आहेत की, विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर थांबणे टाळावे. झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी शेतीकाम करताना विशेष काळजी घ्यावी.
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
