नाशिक | २९.३ | रयत समाचार
(Literature) येथील मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे काल ता. २८ रोजी ज्येष्ठ कवी तु.सी. ढिकले यांच्या दोन पुस्तकांचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन सोहळा पार पडला. ‘राहिले ते तीर्थ’ (आत्मबंधात्मक ललित) आणि ‘भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे’ (विडंबनगीत संग्रह) या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
(Literature) सोहळ्याला साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ साहित्यिक तसेच माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक व वात्रटिकाकार कविवर्य नरेश महाजन, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रसिद्ध विडंबनकार संजय आहेर, वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे कविवर्य रवींद्र मालुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अलकाताई ढिकले यांच्यासह अनेक साहित्यप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली.
(Literature) कार्यक्रमात मान्यवरांनी तु.सी. ढिकले यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव करत त्यांच्या लेखनातील संवेदनशीलता, विनोदबुद्धी आणि समाजभान यांचा विशेष उल्लेख केला. ‘राहिले ते तीर्थ’ या पुस्तकातून आत्मानुभवांची भावस्पर्शी मांडणी तर ‘भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे’ या विडंबनगीत संग्रहातून समाजातील विसंगतींवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यामुळे नाशिकच्या साहित्य क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक खास मेजवानी ठरली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
