मुंबई | २८.३ | रयत समाचार
(World news) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक काल ता.२७ मार्च रोजी पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते.
देशातील १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील तयारी व उपाययोजनांची माहिती दिली.
(World news) जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची तयारी, केंद्र- राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि नागरिकांवर अतिरिक्त भार पडू न देणे यावर बैठकीत चर्चा झाली. ‘टीम इंडिया’च्या भावनेतून समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण आवश्यक असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
(World news) यावेळी फडणवीस यांनी सांगितले, इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. ऊर्जा स्रोतांचे विकेंद्रीकरण, सौर ऊर्जा, ईबसेस यांसारख्या उपक्रमांमुळे देश अधिक सक्षम झाला आहे.
राज्यात खतांची पुरेशी उपलब्धता असून खरीप हंगामासाठी तयारी सुरू आहे. साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई केली जात असून अॅग्रीस्टॅकद्वारे पारदर्शकता वाढवली जात आहे. तसेच PNG विस्तार आणि ‘Ease of Doing Business’ अंतर्गत प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
