Politics | अजित पवार यांच्या मृत्यूवर विधानसभेत चर्चा रोखली; अपघातामागे मोठ्या शक्तीचा संशय; रोहित पवारांचा गंभीर आरोप

न्यायासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १८.३ | रयत समाचार

(Politics) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणावर विधानसभेत चर्चा करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

(Politics) आमदार रोहित पवार यांनी सांगितले, या संवेदनशील विषयावर विस्तृत चर्चा व्हावी यासाठी त्यांनी कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे स्थगन प्रस्ताव सादर केला होता. मात्र, आज हा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही.

(Politics) पवार पुढे म्हणाले, अजितदादांसारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्या घटनेवर विधानसभेत साधी चर्चाही होऊ दिली जात नाही, याचा अर्थ काय? आम्ही या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्हाला थांबवण्यात आले.

यावरून या अपघातामागे काहीतरी मोठे आणि संशयास्पद कारण असण्याची शक्यता व्यक्त करत पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निर्णयामुळे आमच्या संशयाला अधिकच बळ मिळत आहे, असेही ते म्हणाले.

तसेच, सरकार हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, अजितदादांना न्याय मिळावा यासाठी आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.

दरम्यान, या प्रकरणामुळे विधानसभेतील वातावरण तापले असून, विरोधकांकडून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading